अडावद (डाॅ .सतीश भदाणे ) :---
तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माचला या गांवी दि.17 व दि.21 यादिवशी एकाच ठिकाणी झालेल्या धाडसी चोरीचा उलगडा करण्यात अडावद पोलीसांना यश आले असुन ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.मात्र अद्यापपावेतो मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी प्रविण देवराम निकम यांचे चोपडा तालुक्यातील माचला या गांवी सिमेंट पाईप बनविण्याचा कारखाना होता.मात्र काही वर्षापासुन तो बंद असल्याकारणाने तेथील सर्व साहित्य त्याठिकाणीच पडून होते.याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्याठिकाणी डल्ला मारुन दि. १७ रोजी रु.५ लाख ६८ हजाराचा माल व दि.२१ रोजी रु.१३ लाख ८५ हजाराचा माल असा एकुण रु.१९ लाख ५३ हजाराच्या साहित्यांची चोरी केली होती .त्याबाबत फिर्यादी प्रविण देवराम निकम यांनी अडावद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती व भारतीय दंड संहिता १८६० ,३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर फिर्याद दाखल होताच, सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण दांडगे यांनी तपासाची चक्रे फिरवली.व दि.२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन तपास पथके त्याकामी रवाना झालीत.त्यामध्ये एका पथकात स्वतः प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण दांडगे व पोलीस काँस्टेबल योगेश गोसावी व दुसऱ्या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश घायतळ ,हेड काँस्टेबल कादीर शेख,पोलीस काँस्टेबल अक्षय पाटील व गजानन आरेकर हे होते. रात्रभर चाललेल्या कारवाईत यावल व जळगांव येथुन ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले व चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले अशोक लेलँड कंपनीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजय दिनकर तायडे रा.यावल,शेख फारुख खाटीक,दिगंबर कोळी,अशफाक खाटीक व रईस शेख कुर्बान चारही रा.जळगांव हे आहेत.आरोपींनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली देत त्या चोरीमध्ये प्रत्येकांची भुमिका काय होती तेही सांगितले तसेच गुन्ह्यामधे वापरण्यात आलेले अशोक लेलँड कंपनीची पांढऱ्या रंगाची मालवाहतुक गाडी गावातील एका साक्षीदाराने सांगितल्याचे अडावद पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांनी सांगितले.
श्री.किरण दांडगे ,स.पोलीस निरीक्षक ,अडावद पोलीस स्टेशन
या संपुर्ण कारवाईमध्ये अद्यापपावेतो चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले नाही.सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असुन आरोपींकडे मुद्देमाला संबंधी विचारपुस सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांनी सांगितले.काही दिवसांमध्येच चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अडावद पोलीसांना यश आले हे प्रशंसनीय आहे