धुळे दि. 29 (प्रतिनिधी) धुळे-आज दि.29/6/2021रोजी आदीवासी टोकरे कोळीं च्या वाल्या सेना गृप च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले....
मागील आठवड्यात राजहंस काँलनीत कोळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक रिटायर्ड बंँक अधिकारी कै रमेश श्रीराव साहेबांची त्यांच्या च घरातील भाडेकरून हत्या केली.तसेच त्यांच्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला केला...
या केस मधील हत्यारा आरोपी अटकेत आहेत परंतु त्याच्या सोबत राहत असलेले कुटूंबीय ही यात सहभागी होते का या साठी जामीनावर सुटलेल्या , घरात विषाच्या बाटल्या बाळगणा-या मारेक-याच्या कुटूंबीय यांची कसून चौकशी करण्यात यावी....व हत्येचा आरोपी असलेल्या अजिंक्य मेमाणे ला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी धुळे तालुका वाल्या सेना गृप तर्फे उपविभागीय अधिकारी मा.श्री.पिंगळे साहेब यांना निवेदन देण्यात आले... वाल्या सेना गृप धुळे तालुका विभाग सदस्य अमोल कोळी, रवींद्र कोळी, आत्माराम कोळी, विजय चित्ते, विशाल कोळी, चेतन शिरसाठ, निलेश कोळी, गोपाल कोळी,शांताराम कोळी यांच्या सोबत सौ गीतांजली ताई कोळी यांनी हे निवेदन दिले....