*आपतीग्रस्त शेतकर्यांना तातडीच्या मदतीसाठी शासनाकडून पाठपुरावा करू : माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ चौधरी*
भुसावळ दि. 2 (प्रतिनिधी)रावेर तालुक्यातील केळी पट्ट्यात आलेल्या अवकाळी वादळामुळे शेकडो हेक्टरवरील केळी आडवी होवून केळी उत्पादकांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी
सातपुड्यातील पाल परीसरातील गुलाबवाडी, जीन्सी, आभोडा मोरव्हाल येथे झालेल्या नुकसानीनंतर शेतांची पाहणी करीत शेतकर्यांना धीर दिला. आपत्तीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. महसूल प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शेतकर्यांना भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार ः अनिल चौधरी
अनिल चौधरी म्हणाले की, अशा संकटाच्या काळात शेतकर्यांना दिलासा व मदत मिळणे अपेक्षित आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर या परीसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. महसूल प्रशासनाने तातडीने या भागातील पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा, असेही ते म्हणाले. यावेळी शेतकरी रघुनाथ कोल्हे, दिलीप बंजारा, रोशन तडवी, संजय पाटील, बक्षीपुरचे अनिल चौधरी व ग्रामस्थ होते.