जळगाव दि. 28(प्रतिनिधी)येथील महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेत जळगाव शहर महानगरपालिकेस सन 2016-17 या वर्षात प्राप्त झालेल्या 25 कोटी रुपयांच्या अनुदानातून शिल्लक राहिलेल्या 4.17 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे
जळगाव महापालिका महासभा ठराव क्र. 365 दि. 3 फेब्रुवारी, 2021 व महासभा ठराव क्र. 488, दि. 15 मे, 2021 नुसार नवीन विकास कामे प्रस्तावित केलेली आहेत. यात वार्ड क्रं. 19 अंतर्गत येत असलेल्या सुप्रिम कॉलनीत व आजुबाजुच्या परिसरात अस्तित्वात असलेल्या पोलांवर स्ट्रिट लाईट फेज वायर ओढून पथदिव्याची व्यवस्था करणे, जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाच्या (रेल्वे लेव्हल क्रॉसिंग 420 -9/11) जोडरस्त्याच्या संरेखेच्या मार्गातील उच्चदाब/लघुदाब वीज वाहिनी स्थलांतरीत करणे, प्रभाग क्र. 2 कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, जळगाव शहरात आवश्यक ठिकाणी स्त्री व पुरुषांकरीता स्वच्छतागृह/ युरिनल्सची व्यवस्था करणे, डी मार्ट ते रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौक पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, पिंप्राळा स्मशानभुमी सुशोभीकरण करुन विकसित करणे, प्रभाग क्र. 12 मधील रामदास कॉलनी ओपनस्पेस येथे संरक्षण भिंत बांधणे आदि कामांना प्रस्ताव देण्यात आला होता.त्यासआजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.