नागरी दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 31.61 कोटींच्या निधी वितरणास पालकमंत्र्यांची मान्यता


   जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी ) - अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपंचायतींसाठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) सन 2021-22 मधील प्रस्तावित 31.61 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
            येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात समितीची जिल्हास्तरीय बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
            लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीत सुविधा पुरविण्यासाठी जळगव शहर महानगरपालिकेस 5 कोटी रुपयांचा तर जिल्ह्यातील 18 नगरपालिका/नगरपंचायतींना 26.61 कोटी रुपये असा एकूण 31.31 कोटी रुपयांचा निधी अनुसूचित जाती उपयोजनेतून मंजूर झाला आहे.
            त्यानुसार भुसावळ नगरपालिकेस 8 कोटी 95 लाख, अमळनेर 2 कोटी 25 लाख, चाळीसगाव 3 कोटी 20 लाख, चोपडा 1 कोटी 70 लाख, पाचोरा 1 कोटी 85 लाख, जामनेर 1 कोटी 15 लाख, पारोळा 52 लाख, धरणगाव 62 लाख, एरंडोल 65 लाख, यावल 85 लाख, रावेर 65 लाख, फैजपूर 53 लाख, भडगाव 60 लाख, वरणगाव 1 कोटी 15 लाख, बोदवड नगरपंचायत 65 लाख, मुक्ताईनगर नगरपंचायत 80 लाख, शेंदूर्णी नवनिर्मित नगरपंचायत 49 लाख 91 हजार 225 रुपये असा एकूण 26 कोटी 61 लाख 91 हजार 225 रुपयांचा निधी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणातवितरीत करण्यास आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.या निधीतून नागरी क्षेत्रात नागरीकांसाठी चांगल्या दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा उभारण्याच्या सूचनांही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने