सूर्योदय फाउंडेशन प्रयागराज व विश्वमानव विकास फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यात ४००महिलांना शिलाई मशीन वाटप..

 सूर्योदय फाउंडेशन प्रयागराज व विश्वमानव विकास फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यात ४००महिलांना शिलाई मशीन वाटप..


चोपडा दि.७(प्रतिनिधी) सूर्योदय फाउंडेशन प्रयागराज व विश्वमानव विकास फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरात हिरे भवन येथे महिलांना निशुल्क मोफत शिलाई मशीन वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीश्री अनुप अग्रवाल विधानसभा सदस्य भाजपा महाराष्ट्र, सौ मायादेवी परदेशी महापौर धुळे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे सौ कल्याणी सतीश अंपलकर उपमहापौर धुळे महानगरपालिका, श्री गजेंद्र महादेव अंपलकर जिल्हाध्यक्ष भाजपा धुळे

 श्री आकाश परदेशी युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा धुळे महानगर अजय अग्रवाल कोषाध्यक्ष धुळे महानगर, श्री ओम प्रकाश खंडेलवाल नगरसेवक भाजपा धुळे महानगरपालिका श्री वीरेंद्र कुमार राय सचिव सूर्योदय फाउंडेशन श्री घनश्याम द्विवेदी उपाध्यक्ष सूर्योदय फाउंडेशन श्री धनराज वसंत बडगे अध्यक्ष विश्व मानव विकास फाउंडेशन सौ सीमा धनराज बडगे उपाध्यक्ष विश्व मानव विकास फाउंडेशन श्री विनोद पांडुरंग चौधरी मीडिया प्रभारी विश्व मानव विकास फाउंडेशन सौ माधुरी विनोद चौधरी महिला संघटक विश्व मानव विकास फाउंडेशन म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमात पात्र व गरजू महिलांना जवळपास  400 पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी मोफत शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. सूर्योदय फाउंडेशन व विश्वमानव विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे व राबविला जाणार आहे आणि पात्र व गरजू महिलांनी या शिलाई मोफत चा लाभ घ्यावा असे यावेळी सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष व विश्वमानव विकास फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात सांगितले  सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांसाठी भोजनाची व पिण्याच्या शुद्ध पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती  मोफत शिलाई मशीन मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा विशेष आनंद दिसत होता लाभार्थ्यांनी सूर्योदय फाउंडेशन व विश्वमानव विकास फाउंडेशन यांच्या प्रति आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने