आयडियल इंग्लिश अकॅडमीच्या कु. इंद्रजीत क्षीरसागर याने 45 अक्षरांचा शब्द केला पाठ
चोपडा,दि.७(प्रतिनिधी): आयडियल इंग्लिश अकॅडमीच्या कु. इंद्रजीत क्षीरसागर याने पाठ केला इंग्रजी भाषेतील सर्वात मोठा शब्द.. 'pneumoniaultramicroscopicsilicovolcanoconiosis'हा आहे. या शब्दात एकूण 45 अक्षरे येतात. या शब्दाचा उच्चार निमोनोअल्ट्रामायक्रोस्कॉपिक सिलिकोवोल्कॅनोकोनोसिस असा होतो. या शब्दाचा अर्थ फुप्फुसाचा एक आजार असा होतो. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे नवनवीन कौशल्य व शब्दसंग्रह माहिती व्हावे हा यामागचा उद्देश होता. इयत्ता सहावीचा विद्यार्थी इंग्रजीत क्षीरसागर याने हा शब्द काही मिनिटात पाठ करून दाखवला.. आयडियल इंग्लिश अकॅडमीचे संचालक श्री पदमाकर पाटील हे विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शब्द, नवनवीन वाक्प्रचार हे दैनंदिन जीवनात कसे वापरात आणणे शिकतील यासाठी प्रयत्नशील असतात.ईंद्रजित क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
