बांधकाम व्यावसायिक श्री संजीव बैसाणे यांचेकडे चोपडा तालुका अध्यक्षपदाची धुरा!
♦️ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनने सोपवली जबाबदारी
चोपडा दि.१४(प्रतिनिधी) : राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव 2026 निमित्त 2 ऑगस्ट 2026 रोजी धुळे येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवा उद्योग शिक्षण प्रशासन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील बांधकाम व्यावसायिक वास्तु निर्मिती फर्म चे मालक श्री संजीव गंगाधर बैसाणे यांना बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व सामाजिक कार्यात सहभाग या कामांची दखल घेत प्रतिष्ठेचा उद्योजक रत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात श्री संजीव बैसाणे यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीपत्र व पदभार मानवाधिकार आयोग आणि भ्रष्टाचार विरोधी समितीचे फाउंडर अँड नॅशनल प्रेसिडेंट अशोक पवार तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवाधिकार संरक्षण सामाजिक न्यायाचे प्रभावी अंमलबजावणी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती आणि सामाजिक वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याची आवश्यकता अधोरेखित केली . नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी समाज हिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा ही व्यक्त करण्यात आली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री संजीव बैसाणे यांनी हा सन्मान आपल्या उद्योगाशी निगडित सर्व सहकाऱ्यांचा व कुटुंबीयांचा असल्याचे सांगत भविष्यातही बांधकाम व्यवसायात उत्कृष्ट सेवा देणे बाबत व सामाजिक बांधिलकी जपत कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच मानवाधिकार संरक्षण आणि भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी संघटनेच्या माध्यमातून चोपडा तालुक्यात प्रभावीपणे काम करण्याचे आश्वासन दिले श्री संजीव बैसाणे यांना मिळालेला राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार आणि चोपडा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी ही जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून विविध सामाजिक औद्योगिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
