घोडगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अरुण पाटील, तर व्हा. चेअरमनपदी सौ. संगिताबाई पाटील यांची बिनविरोध निवड
चोपडा,दि.१४ (प्रतिनिधी)..येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अरुण काशीनाथ पाटील, तर व्हा. चेअरमनपदी सौ. संगिताबाई एकनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूषण बारी यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव राजेंद्र कोळी व भूषण सोनार यांनी सहकार्य केले.
विशेष म्हणजे चेअरमनपदासाठी अरुण काशीनाथ पाटील यांना विरोधी गटातील संचालक आनंदराव पाटील, प्रकाश रजाळे, संजय पाटील व सुनील पाटील यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे ही निवड बिनविरोध पार पडली.
यावेळी संचालक मधुकर पाटील, जवरीलाल जैन, मन्साराम कोळी, राहुल पाटील, मिनाबाई पाटील, आनंदराव पाटील, प्रकाश रजाळे, संजय पाटील व सुनील पाटील स्वीकृत संचालक दिलीप कोळी, उपस्थित होते.यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे ग्रामस्थ व सभासदांकडून अभिनंदन करण्यात आले.
