अडावद सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 अडावद सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा       

अडावद,ता.चोपडा दि. 16(प्रतिनिधी)   येथील सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला   यावेळी  राष्ट्रीय  ध्वजाचे  ध्वजारोहण संस्थेचे  संचालक तथा वडगाव बुद्रुक चे माजी सरपंच नामदेव  पाटील     यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.तर स्काऊट गाईडचे  ध्वजारोहन    दहावीच्या   चैतन्य पवार  या  विद्यार्थ्याच्या   शुभहस्ते करण्यात आले.  स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून  राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. 

याप्रसंगी   माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी   देश भक्तीवर गित   सादर करण्यात येऊन व्यसनमुक्त विद्यार्थी व्यसनमुक्त महाराष्ट्र प्रतिज्ञा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्तीची शपथ, साक्षरता शपथ, कॉपीमुक्त अभियान अंतर्गत इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षा कापीमुक्त,भयमुक्त, निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली .    यावेळी मुख्याध्यापक ए जे कदम  व  पर्यवेक्षक मनोहर पाटील  सर्व शिक्षक  यांनी आलेल्या  मान्यवराचे  स्वागत करण्यात आले. प्रस्तावनेत सचिन पाटील   यांनी भारतीय स्वातंत्र्याबद्दल प्रकाशझोत टाकला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, उपाध्यक्ष रतिलाल महाजन, सेक्रेटरी तथा सार्वजनिक माध्यमिक शाळेचे चेअरमन  बाळासाहेब देशमुख,   सार्वजनिक प्राथमिकचे,चेअरमन   नामदेव  पाटील,  सहसेक्रेटरी मीनाताई देशमुख, संचालक मनोजकुमार देशमुख,रामकृष्ण पाटील, मधुकरराव देशमुख, शांताराम कोळी,हरीष पाटील, सेवानिवृत कर्मचारी प्रमोद देशमुख ,माजी मुख्याध्यापक   जी व्ही पाटील, बहुसंख्यपालक वर्ग व  गावातील  विविध  संस्थाचे आजी माजी  पदाधिकारी  व  ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन,कवायत संचलन  व सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचलन सचिन पाटील  यानी केले  तर आभार नितीन महाजन  यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  सार्वजनिक विद्यालय व कै. रामराव गुलाबराव देशमुख पूर्व प्राथमिक विदयालय च्या मुख्याध्यापिका हिमांशी पाटील,सार्वजनिक खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर साळुंके व सर्व शिक्षक व शिक्षिका व  शिक्षकेतर कर्मचारी   यांनी  सहकार्य  केले .



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने