विवेकानंद विद्यालयातर्फे पहाटे पाच वाजता मशाल फेरी व स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात संपन्न

 विवेकानंद विद्यालयातर्फे पहाटे पाच वाजता मशाल फेरी व स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात संपन्न


चोपडा,दि.१६ (प्रतिनिधी) येथील प्रतिवर्षाप्रमाणे विवेकानंद विद्यालयाची पहाटे पाच वाजता इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गांधी चौकातून गावात मशाल फेरी काढण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर ,सहसचिव डॉ.विनीत हरताळकर , विश्वस्त डॉ.अमित हरताळकर ,विश्वस्त नरेंद्र भावे,मुख्याध्यापिका सरला शिंदे,आशा चित्ते, रेवती दीक्षित,योगिता केंगे,पर्यवेक्षक पवन लाठी, संजय सोनवणे,यांच्या हस्ते पंधरा मशाली प्रज्वलित करून मशाल फेरी चे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहत गावात देशभक्तीपर घोषणा तसेच उषःकाल होता होता हे समूहगीत गायन करून मशाल फेरी संपन्न केली. सोबत सर्व शिक्षकवृंद सहभागी होते.नंतर विद्यालयात सर्व विभागाचा एकत्रित ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका भारती पंजाबी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परेड करून केले.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठ, राष्ट्रीयगीत वंदे मातरम् याने झाली. ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर ,विश्वस्त डॉ. अमित हरताळकर ,करण अग्रवाल , डॉ. नीरज पोतदार, डॉ. महेंद्र जैस्वाल, डॉ. लीना जैस्वाल, सरोज अग्रवाल, डॉ.मनोहर अग्रवाल,सुभाष अग्रवाल,ज्योत्स्ना हरताळकर ,डॉ.प्रियंका पोतदार,  निधी अग्रवाल ,नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका सरला शिंदे, भारती पंजाबी,आशा चित्ते, रेवती दीक्षित, योगिता केंगे , ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.सी. पाटील सर्व मान्यवर, शिक्षकवृंद , विद्यार्थीवृंद, पालकवृंद , माजी विद्यार्थी यांनी ध्वजवंदना करत राष्ट्रगीताचे गायन केले. लगेचच राज्यगीत, झंडागीत गायन केले.उपशिक्षक दीपक पाटील यांच्या सोबत सर्व उपस्थितांनी घोषणा दिल्यात.विद्यालयाचे संगीत शिक्षक विवेक बाविस्कर यांनी प्रत्येक विभागाचे समूहगीत सादर केले. क्रीडा शिक्षक विजय पाटील व राजेंद्र अल्हाट यांनी विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीतांवर कवायत सादर केली.प्राथमिक विभागाच्या उपशिक्षिका मेघा पाटील यांनी इयत्ता चौथीच्या मुलांचे  राष्ट्रीय देशभक्तीपर गीतांवर आधारित लेझीम पथक सादर केले.15 ऑगस्ट ची  सजावट व फलक रेखन - लेखन कलाशिक्षक राकेश विसपुते, सीमा पाटील,शितल देसाई यांच्यासह सर्व शिक्षकवृंद यांनी केली. शाळेतील महिला शिक्षिकांनी सुंदर रांगोळी साकारली.इंग्रजी विभागाच्या प्रिन्सिपल भारती पंजाबी यांच्या संकल्पनेतून बालकलाकारांनी वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या वेशभूषेत आपली भूमिका बजावली.त्याचप्रमाणे उपशिक्षिका माधुरी हळपे यांनी साक्षरतेची शपथ, उपशिक्षक जावेद तडवी यांनी व्यसनमुक्ती शपथ ,उपशिक्षक प्रसाद वैद्य यांनी तंबाखूमुक्त शपथ उपस्थित सर्वांकडून म्हणून घेतली. डॉ.महेंद्र जैस्वाल यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. त्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक राधेश्याम पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी 15 ऑगस्ट समिती प्रमुख .पर्यवेक्षक पवन लाठी,उपशिक्षक राकेश विसपुते,विजय पाटील, संजय खैरनार यांच्या नियोजनानुसार  सर्व विभागाच्या शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने