घाडवेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 घाडवेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


 चोपडा,दि.१६(प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाडवेल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने घाडवेल गावाचे  सैनिक कमलाकर धनसिंग पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ करण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, घोषवाक्ये व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा संदेश दिला. शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळी व सजावट करण्यात आली होती. आणि  ग्राम विकास अधिकारी  महेंद्र पाटील व  अशोक कोळी यांच्या हस्ते वही पेन चॉकलेट इत्यादी 

यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि देशाप्रती असलेल्या नागरिकांच्या कर्तव्याची माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संदेश दिला. उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने