अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अडावद (ता. चोपडा):  येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालय, आदर्श प्राथमिक शाळा व पूर्व प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता शाळेच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. संस्थेचे अध्यक्ष भगवान शामराव महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी 'वंदे मातरम' गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. 

     याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव महाजन, सचिव रमेश पवार, सहसचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. माळी, सर्व संचालक मंडळ, गावातील सहकारी संस्थांचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांचे थक्क करणारे सादरीकरण*

    ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर उत्कृष्ट कवायत सादर केली. आदर्श प्राथमिक शाळेच्या इयत्ता चौथीच्या चिमुकल्यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले. तसेच, स्काऊटच्या आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत ध्वजवंदना केली. यानंतर सर्व विद्यार्थी बँड पथकाच्या सुरेख तालावर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक ध्वजारोहणासाठी मार्गस्थ झाले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शामराव येसो महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, एन. ए. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पि. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि. एस. पवार, डी. डी. महाजन यांनी परिश्रम घेतले. 

      तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन, एस. टी. महाजन, आर. जे. महाजन, वाय. एल. साळुंखे, डी. आर. वाघ, कामिनी चौधरी, पूर्व प्राथमिकच्या शिक्षिका पूनम सुतार, वर्षा महाजन, कविता महाजन, सुनीता महाजन आणि शिक्षकेतर कर्मचारी लिपिक सी. एस. महाजन, शिपाई ईश्वर मिस्तरी, रविंद्र महाजन, कैलास महाजन आदींनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने