चोपड्यात आमदार सौ. चित्राताई वाघ यांचा चोपड़ा सुवर्णकार समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार
चोपडा,दि.१६(प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (जळगाव पूर्व) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक आढावा बैठकीच्या निमित्ताने चोपडा येथे आगमन झालेल्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार सौ. चित्राताई वाघ यांचा चोपडा येथील सुवर्णकार समाजाच्या वतीने भावुक व उत्साही वातावरणात नागरी सत्कार व गौरव करण्यात आला.
सौ. चित्राताई वाघ या सुवर्णकार/सोनार समाजाची लेक असून त्या समाजासाठी अत्यंत आदर्श आणि अभिमानास्पद अशा महिला भगिनी आहेत, या भावनेतून सुवर्णकार समाज बांधवांनी त्यांचा गौरव केला. या प्रसंगी समाजाच्या वतीने त्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विलास सोनार सर, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव डॉ.विजय जाधव,अनिल वानखेडे, रवीभाऊ सोनार, भटू विस्पुते,गौरव अहिरराव,स्वप्नील पोतदार, श्री.श्रीराम सोनार,विनोद सोनार,जितेंद्र विसपुते, राकेश विसपुते, मनोज सोनार यांसह सुवर्णकार समाजाचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि सुवर्णकार समाजाच्या महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या आढावा बैठकीत महिला संघटन बळकट करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. समाजाची लेक म्हणून सुवर्णकार समाजाने दाखवलेले प्रेम, आदर आणि केलेल्या सत्काराबद्दल आ. सौ. चित्राताई वाघ यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
