चोपडा पोलीसांचे दंगल काबूवर प्रात्यक्षिक सराव..एसडीपो सुनील यांच्या मार्गदर्शनात मॉक ड्रिल

 चोपडा पोलीसांचे दंगल काबूवर प्रात्यक्षिक सराव..एसडीपो सुनील पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनात मॉक ड्रिल

चोपडा दि.14(प्रतिनिधी)शहर पोलीस स्टेशन मार्फत शहरातआज रोजी दंगा काबू योजना राबविण्यात आली.चोपडा शहरात अचानक  दंगलसदृश परिस्थिती, जातीय तणाव किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तात्काळ आणि प्रभावीपणे हाताळण्यासाठी चोपडा पोलिस प्रशासनाने तयार केलेले आपत्कालीन नियोजन व कृती दल वापरून योजना राबविण्यात आली. अशा  परिस्थितीत  दंगल किंवा हिंसाचार पसरल्यास त्वरित घटनास्थळी पोहोचून गर्दीवर तातडीने कसे नियंत्रण मिळविले जाते याबाबत सराव करण्यात आला.

 पोलिस दल, अग्निशामक दल (Fire Brigade) आणि वैद्यकीय पथक (Medical Team) यांच्यात आपत्कालीन समन्वय कसा साधावा याबाबत संयुक्तीक सराव (मॉक ड्रिल) करण्यात आला.संवेदनशील भाग म्हणजे  शासकीय आस्थापना व सार्वजनिक ठिकाणांचे सशस्त्र सुरक्षा कवच व संरक्षण पुरवण्यात बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या पथकाच्या रचनेत  साधनसामग्री पोलीस व अधिकारी,विशेष प्रशिक्षण घेतलेले अंमलदार व तरुण पोलिस अधिकारी व अंमलदार,सुरक्षा साहित्य, लाठी सेक्शन, अश्रुधूर (Tear Gas), ढाल सेक्शन आणि दंगल नियंत्रण शस्त्रे यावर अभ्यास पूर्ण माहिती देण्यात आली.या दंगल काबू सरावात SDPO चोपडा सह, 5 पोलीस अधिकारी व 36 अंमलदार हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने