चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व अध्यापक विद्यालयात आदिवासी दिवस साजरा
चोपडा, दि. 14(प्रतिनिधी) : चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय व अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, लोककला, जीवनपद्धती आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान बिरसा मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन आदिवासी विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सविता जाधव यांनी केले. त्यांनी आदिवासी दिवसाचे महत्त्व विशद करून आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे यांनी आदिवासी संस्कृतीविषयी मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाची जीवनपद्धती, विविध परंपरा, लोककला, निसर्गाशी असलेले नाते तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. आदिवासी संस्कृतीमध्ये निसर्गप्रेम, सामूहिकता, साधेपणा आणि परंपरांचे जतन यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी संस्कृतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच भारतीय समाजातील सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास,कार्यक्रमाचे उदघाट्क श्री.गोविंदभाई गुजराथी, आय.क्यू.ए.सी. समितीचे सदस्य श्री. डी. टी. महाजन, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री. किरण पाटील, ज्येष्ठ प्रा. ,श्री. एम. पी. पाटील, प्रा. एन. डी. वाल्हे, प्रा. संजय देशमुख, प्रा. सुजय धनगर, कला शिक्षिका प्रा. मीनल पाटील, प्रा. रश्मी शेख, श्री. दीपक विसावे, प्रा. पूजा माळी, शुभम गुजराथी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
