स्वच्छता पखवाडा -2026 अंतर्गत समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे श्रमदानातून "परिसर स्वच्छता दिन" साजरा

 स्वच्छता पखवाडा -2026 अंतर्गत समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे श्रमदानातून "परिसर स्वच्छता दिन" साजरा

चोपडा दि.१४(प्रतिनिधी) : आज दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे "स्वच्छता पखवाडा"- 2026 आणि समाजकार्य पंधरवाडा निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्रमदानातून महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता करण्यात आली. 

           या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छता हीच सेवा, परिसराची स्वच्छता आणि श्रमदान याचे महत्त्व पटवून देण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

        सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. ईश्वर सौंदाणकर, (प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), प्रा. डॉ. आशिष गुजराथी, (उपप्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), प्रा. डॉ. संबोधी देशपांडे,(कार्यक्रम अधिकारी), प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे,(सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने