लासूरच्या विशाल सपकाळेचा 'Voice of Nandurbar – Season 6' मध्ये प्रथम क्रमांक

 लासूरच्या विशाल सपकाळेचा 'Voice of Nandurbar – Season 6' मध्ये प्रथम क्रमांक


चोपडा दि.१५(प्रतिनिधी)नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरी आयोजित 'Voice of Nandurbar – Season 6' कराओके गीत गायन स्पर्धा 2026 पार पडली. या स्पर्धेत लासूर येथील विशाल सपकाळे याने आपल्या उत्कृष्ट गायनाने प्रथम क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना नंदुरबारचे माजी आमदार चंदुभैय्या रघुवंशी यांच्या हस्ते ₹15,000 रोख पारितोषिक, संगीत साहित्य, स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.*

विशाल सपकाळे हे लासूर येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक शिक्षक श्री. जी. एस. सपकाळे सर यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे लासूर गावाचा नावलौकिक वाढला असून, संपूर्ण गाव, तालुका तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने