परमात्म्याच्या कृपेने "गीता भारती "झाली पूर्ण : पंडित मुस्तफा आरिफ ♦️ दूर्मिळ भेटित अरुणभाई गुजराती यांच्याशी चर्चा

 

परमात्म्याच्या कृपेने "गीता भारती "झाली पूर्ण : पंडित मुस्तफा आरिफ
♦️ दूर्मिळ भेटित अरुणभाई गुजराती यांच्याशी चर्चा


चोपडा,दि. ८(प्रतिनिधी): आध्यात्मिक लेखक पंडित मुस्तफा आरिफ यांनी आपली नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तक **गीता-भारती (भगवद्गीता: हिंदी मुक्तकात)* महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष श्री अरुणभाई गुजराती यांना भेट दिली.
पंडित मुस्तफा यांनी श्री अरुणभाई यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, भारताचे धर्मग्रंथ कर्मावर आधारित आहेत आणि याच साम्य जगातील अनेक धर्मग्रंथांमध्ये दिसून येते. या धर्मग्रंथांवर टीका करणे किंवा लेखन करणे हे परमात्म्याच्या आज्ञे आणि मर्जीशिवाय शक्य नाही.
पंडित मुस्तफा यांनी सांगितले की, भगवद्गीतेच्या ७०० श्लोकांचे त्यांनी ७८६ हिंदी मुक्तकांमध्ये काव्यात्मक रूपांतर केले आहे. भगवद्गीता कर्मप्रधान ग्रंथ आहे. पहिल्या अध्यायापासून १८व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला क्षत्रिय धर्माच्या कर्माचे बोध करत, कर्तव्य पालनासाठी प्रेरित केले.
यापूर्वी पंडित मुस्तफा यांनी कुराणाचे १०,००० पदांमध्ये रूपांतर केले होते, ज्यामुळे त्यांना भगवद्गीतेवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. कुराणही मुळात कर्मप्रधान ग्रंथ आहे, ज्यात माणसाला सद्कर्म करण्याची प्रेरणा दिली आहे. कुराणापेक्षा ५००० वर्षांपूर्वी भगवद्गीतेचा अवतार झाला. कुराणाच्या दुसऱ्या अध्यायातील चौथ्या पदात स्पष्ट निर्देश आहे की, कुराणाबरोबरच पूर्वी पाठवलेल्या ग्रंथांनाही मान्यता द्या.असेही त्यांनी म्हटले आहे
श्री अरुणभाई यांनी या कार्याला मानवतेला एकत्र जोडण्याचा अद्भुत आणि अनुपम प्रयत्न म्हणून गौरव केला. त्यांनी या पुस्तकाचे अध्ययन करून भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णांच्या मानवकल्याणासाठी दिलेल्या संदेशांना समजून घेण्याचे आवाहन केले. पंडित मुस्तफा यांनी हे संदेश अतिशय सोप्या आणि सुगम हिंदी मुक्तकांमध्ये लिहिले आहेत.या प्रसंगी समाजसेवक श्री आशीषभाई गुजराथी आणि इंजि.अनीसभाई बोहरी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने