चहार्डी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेची जीर्ण इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक; निर्लेखन करून तातडीने पाडण्याची मागणी

 चहार्डी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेची जीर्ण इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक; निर्लेखन करून तातडीने पाडण्याची मागणी

 


चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) : चहार्डी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेची जुनी इमारत सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, ती कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित विभागाकडून अद्याप या इमारतीचे निर्लेखन करून ती पाडण्याची कार्यवाही झालेली नाही.

सध्या या शाळेत सुमारे 80 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या परिसरात ही धोकादायक इमारत उभी असल्याने विद्यार्थिनी, शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात जीर्ण इमारत कोसळण्याचा धोका अधिक वाढला असून, कोणतीही दुर्घटना घडू शकते अशी  भावना ग्रामस्थ व पालकांमधून निर्माण झाली आहे 

तरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जीर्ण इमारतीचे निर्लेखन पूर्ण करून ती सुरक्षितरीत्या पाडावी, तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी जोरदार मागणी पालकांकडून होतआहे.

"(विद्यार्थिनींची सुरक्षितता हीच प्रथम प्राधान्य असली पाहिजे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती आधीच टाळणे अधिक महत्त्वाचे आहे,") भुषण कोळी ग्रामस्थ चहार्डी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने