वारकरी संप्रदायाचे उत्कृष्ट गायनाचार्य ह भ प प्रकाश पाटील

 वारकरी संप्रदायाचे उत्कृष्ट गायनाचार्य ह भ प प्रकाश पाटील 


लासुर ता. चोपडा लासुर हे गाव वारकरी संप्रदायाच्या चळवळीला खूप प्रोत्साहन देत असते .पायी दिंडी असो किंवा वाहनातून तीर्थक्षेत्र  भेटीसाठी दरवर्षी गावातील वारकरी संप्रदायातील मंडळी जात असतात. या वारकरी संप्रदायात कै. आत्माराम बारकु पाटील यांनी लासुर गावात श्रीराम भजनी मंडळ व वैकुंठवाशी परमपूज्य अखंडानंद महाराज यांच्या सानिध्यात राहून भजन, कीर्तन ,भारुडे व गवळणी गीतांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा पाया रुजवण्याचे काम गावात त्यांनी केले होते. त्यांचा हा वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांच्या मोठ्या मुलाने म्हणजे ह भ प प्रकाश आत्माराम पाटील यांनी गेल्या 40 वर्षापासून आज तगायत  सुरू ठेवलेला आहे ..जळगाव धुळे व मध्य प्रदेशातील सीमेलगत असलेल्या मराठी भाषेच्या गावात कुठेही कीर्तन असो ,अखंड हरिनाम सप्ताह , बारसे असो त्या ठिकाणी प्रकाश पाटील यांना आमंत्रित केले जाते .संत तुकाराम महाराज बीज ,संत नामदेव महाराज समाधी सोहळा सप्ताह, संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताह ,श्री सेना महाराज जयंती सप्ताह,गोरोबाकाका महाराज पुण्यतिथी निमित्ताने होणारे कीर्तन असो यामध्ये ह भ प प्रकाश पाटील नेहमी गायनासाठी हजर असतात.  कीर्तनकार महाराजांनी टाकलेला अभंग व त्याला साजेस असं प्रमाण देण्यात ह भ प प्रकाश पाटील यांच्या चांगलाच हातखंडा आहे. त्यांचे आतापर्यंत कित्येक अभंग ,भारुडे व गवळणी तसेच समाजप्रबोधनाची गीते ते गायन करीत असतात. हरिनाम सप्ताह, अखंड ज्योति सप्ताह किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात आयोजित अनेक गीते गायन करीत असतात आजपर्यंत त्यांनी तीनशे ते चारशे अभंग पाठांतर केलेले आहेत . ते नित्यनियम  लासुर येथील श्रीराम मंदिरात  काकडा आरती व हरिपाठ ते गायन करीत असतात .गीत गायनाची चाल अभंग गवळणी यांच्या वेगवेगळ्या चाली म्हणण्यात प्रकाश पाटील यांना उत्कृष्ट जमत. वारकऱ्यांच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार करणे, कीर्तन प्रशिक्षण देणे मुलांकडून हरिपाठ व अभंग पाठ करून घेणे हे सुद्धा ह भ प प्रकाश पाटील करीत आहेत .पुढील पिढी संस्कारशील असावी अध्यात्मवादी असावी असा त्यांचा मानस आहे .त्यांची पुढील पिढी सुशिक्षित असून मुलगा माध्यमिक शिक्षक व सून माध्यमिक शिक्षिका आहे. आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन फिरणारा या गायनाचार्यस मानाचा मुजरा.

                          श्री.देविलाल बाविस्कर (साहित्यिक)

                                               लासुर,ता.चोपडा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने