वर्डी वि का सोच्या चेअरमनपदी प्रदिप शिंदे यांची बिनविरोध निवड ..विकासोत प्रथमच मराठा समाजाला नेतृत्वाची संधी

 वर्डी वि का सोच्या चेअरमनपदी प्रदिप शिंदे यांची बिनविरोध निवड ..विकासोत प्रथमच मराठा समाजाला नेतृत्वाची संधी


वर्डी ता चोपडा,दि.२१ ( वार्ताहर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दिपक चंपालाल पाटील यांनी मौखिक करारानुसार ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी दिनांक २० जुलै रोजी चेअरमनपदा साठी निवडणुक घेण्यात आली.यात चेअरमनपदासाठी प्रदिप शिवाजी शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणुक निर्णय अधिकारी डि आर पुरोहित यांनी बिनविरोध चेअरमन पदासाठी घोषीत केले. चेअरमन प्रदिप शिंदे यांना सुचक दिपक पाटील तर अनुमोदन रविंद्र रघुनाथ धनगर झाले होते.यावेळी सदस्य आधार साळुंखे, धर्मराज पाटील, प्रविण पाटील, राजेंद्र नायदे,मुनाफ पिंजारी, दिलीप काशिनाथ पाटील, भगवान नायदे, शाम नायदे उपस्थित होते.निवडणुक कामकाजी सचिव विनोद पाटील लिपिक सदानंद पाटील,अमोल पाटील सहकार्य केले.नवनियुक्त चेअरमन प्रदिप शिंदे यांचे माजी जि प सदस्य बाळासाहेब पाटील मार्केट कमिटी चे उपसभापती विनायकराव चव्हाण,माजी सभापती कांतीलाल पाटील गजानन पाटील सह संचालक मंडळाने अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने