गणपूर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
गणपूर (ता चोपडा) ता 21प्रतिनिधी : येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक गणवेशाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषा पाटील होत्या. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख बाविस्कर,ऍड. बाळकृष्ण पाटील,सेवानिवृत्त रेल्वे पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव पाटील,भूषण पाटील,सुभाष पाटील, नगराज पाटील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले......
