साई इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी काढली आषाढी वारी
गणपूर(ता चोपडा)ता 28: गलंगी येथील श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करत घोडगाव ते कुसूंबे दरम्यान आषाढी वारी काढली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजंतीसिमच्या पोलिस पाटील स्नेहलता पाटील व देवांशु पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी च्या मुर्तीचे पुजन करुन आरती करण्यात आली. मुख्याध्यापक उमेश महाजन यांनी पांडूरंग अष्टकम् गाऊन विठ्ठलाचा महिमा गाईला. त्यानंतर विठुरायाची पालखी व सर्व विद्यार्थी वारकरी बनून विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी घोडगांव ते कुसुंबे पायी नेण्यात आले. विद्यार्थ्यांनी भक्तिगीतांवर नृत्य सादर केली. विद्यार्थी वारकरी होऊन मृदुंग व टाळ चिपळ्यांच्या तालासुरात विठ्ठल नामाचा गजर करत कुसुंबे येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाची शाळा भरवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुजा सोनवणे यांनी केले. आभार समन्वयक दिपक सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दिपक सोनवणे, छोटू सोनार, सुवर्णा देशमुख, यमुना बाविस्कर, मोनाली महाजन, पुजा सोनवणे,स्वप्नाली करंदीकर,पुजा पाटील, नंदीनी पवार, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.......
