चोपडा येथे आमदार प्रा. आण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांचे शुभहस्ते प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाट्न संपन्न

 चोपडा येथे आमदार प्रा. आण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांचे शुभहस्ते प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाट्न संपन्न

 चोपडा दि.६(प्रतिनिधी)पंचायत समिती चोपडा च्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियाना अंतर्गत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व पंचायत समिती चे विभाग प्रमुख यांचे एक दिवशीय ग्रामपंचायत विकास आराखडा' (GPDP) बाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आनंदराज पॅलेस चोपडा येथे आयोजन करण्यात आले होते

     सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्धघाटक चोपडा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रा.आण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांचे शुभ हस्ते उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.

     याप्रसंगी चोपडा पंचायत समिती चे गट विकास अधिकारी अंजली बर्गे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम ठाकरे, शाखा अभियंता डी आर डोखे, विस्तार अधिकारी आर टी सैंदाणे, जितेंद्र पाटील, योगिनी सोनवणे तसेच तालुक्यातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा.अंजली बर्गे मॅडम यांनी ग्रामपंचायत विकास आराखडा हा ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केला जाणारा वार्षिक आराखडा आहे. यात गावातील लोकांच्या गरजा, समस्या आणि विकासकामांचा समावेश केला जातो.तसेच  ग्रामपंचायत विकास आराखड्याचे उद्दिष्ट मध्ये गावाचा सर्वांगीण विकास करणे,लोकसहभागातून विकासकामे निश्चित करणे,उपलब्ध निधीचा योग्य वापर करणे, मूलभूत सुविधा वाढविणे असे विविध पैलू प्रस्ताविकातून नमूद केले.

    अध्यक्षयी मनोगत व्यक्त करतांना मा.आण्णासाहेब प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांनी आपण सर्वजण ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी येथे एकत्र आलो आहोत. आपण सर्व जाणताच की, लोकशाहीचे खरे बळ हे आपल्या ग्रामपंचायतींमध्ये आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 'पंचायत विकास निर्देशांक' (PAI 2.0) आणि 'ग्रामपंचायत विकास आराखडा' (GPDP) ही अत्यंत महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत.

  शाश्वत विकास आणि आपले गाव: संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेली शाश्वत विकासाची ध्येये (SDGs) आता आपल्या गावापर्यंत पोहोचली आहेत. गरिबीमुक्त, आरोग्यदायी, बालस्नेही, जलसमृद्ध आणि महिलास्नेही गाव बनवणे हे आपले केवळ उद्दिष्ट नाही, तर ते आपले कर्तव्य आहे.  शासनाच्या योजनांचा निधी आणि आपले गावकरी यांचे एकत्रीकरण (Convergence) करून आपण गावाचा कायापालट करू शकतो. माझ्याकडून या विकासयात्रेत तुम्हा सर्वांना पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन प्रशिक्षण प्रसंगी दिले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचे तालुका व्यवस्थापक गोपाल चौधरी, निलेश पर्वते, पेसा तालुका व्यवस्थापक शरद सपकाळे, महाराष्ट्र जिवन्नोती अभियानाचे क्षमता बांधणी सल्लागार विजय पाटील, महाराष्ट्र जिवन्नोती अभियानाचे समूह समन्वयक तसेच कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पंचायत समिती चोपडा येथील स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने