कत्तलीच्या इराद्याने गुरांना जखडून ठेवणाऱ्यावर पोलिसात गुन्हा
चोपडा दि. 8 (प्रतिनिधी) चोपडा शहरातील केजीएन कॉलनी परिसरातील साने गुरुजी वसाहत येथे बंद कत्तलखाण्या समोर एकाच्या घराच्या ओट्यावर पत्री शेडमध्ये कत्तलीचे इराद्याने बांधून ठेवलेले तीन गुरे पोलिसांनी जप्त केले असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी,दि. 07/07/2026 रोजी रात्री 00.30 वा. चोपडा शहरातील बंद कत्तलखानासमोरील के. जी.एन कॉलनी जाणाऱ्या रोडालगत सानेगुरुजी वसाहत भागात इद्रिस ईस्माईल शेख याचे घराचे ओट्यावर पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला अंधारात एक गाय, वासरु व बैल अशांना निरदयतेने कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्याचे उद्देशाने जखडुन बांधुन ठेवलेली मिळुन आले . याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अक्षय विजय पाटील यांच्या तक्रारीवरून यांच्या इद्रिस ईस्माईल शेख विरुद्ध शहर पोलिसात सी सी टी एन एस पुन्हा रजिस्टर क्रमांक 291 ऑब्लिक 2026 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. 1976चे सुधारणेसह 2015 चे कलम 5 (अ), 5 (ब) व 9 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचे गुरे एक लाख वीस हजार रुपये किंमतीचे)ताब्यात घेवुन पो.स्टे. चे आवारात चारा पाण्याची व्यवस्था करुन सुस्थितीत बांधण्यात आले आहे. सदर गुन्ह्याची प्रथम खबर न्यायालयात पाठविण्याची तजविज ठेवुन आहोत. तरी सदर गुन्ह्याचा तपास पोनि पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे सहाय्यक फौजदार दिपक विसावे हे करीत आहेत.
