चोपडा आगारातुन पंढरपुर साठी जादा बसेस..घुमावल येथुन दोन बसेस रवाना

 चोपडा आगारातुन पंढरपुर साठी जादा बसेस..घुमावल येथुन दोन बसेस रवाना

चोपडा दि.८(प्रतिनिधी)आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुर यात्रोत्सव साठी जाणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या भाविकांसाठी राज्य परीवहन महामंडळच्या चोपडा आगारातुन दिनांक ६ जुन पासुन जादा बस सुरु करण्यात आली असुन प्रवाशी संख्ये नुसार जादा बसेस सोडण्यात येतील.तसेच ज्या गावातुन ४४ प्रवाशी उपलब्ध होतील तेथुन थेट पंढरपुर साठी भाविकांसाठी बस सोडण्यात येतील.चोपडा ते पंढरपुर पुर्ण तिकिट ९३१ तर हाफ तिकिट ४७० रुपये आहे. तरी पंढरपुर जाणाऱ्या भाविकांनी जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे. तसेच घुमावल येथुन तिर्थाटन योजने अंतर्गत दोन बसेस आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या हस्ते पुजन करून सोडण्यात आल्या, यावेळी नितिन सोनवणे, अनिकेत न्हायदे, चालक योगेश्वर पाटील विशाल पाटील, जगदिश पाटील सुनिल बाविस्कर भगवान न्हायदे,जिजाबराव देवराज उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने