१ ते १५ मे दरम्यान 'स्व गणना' करा.. नगराध्यक्ष सौ नम्रता सचिन पाटील यांचे आवाहन
चोपडा,दि.४(प्रतिनिधी) भारत सरकारने जनगणना २०२७ चा कार्यक्रम घोषित केला असून ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. यातील घर गणनेच्या कालावधी १६ मे ते १४ जून असा निश्चित करण्यात आला आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी १ ते १५ मे या कालावधीत स्व गणना चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन नागरिक स्वतःची माहिती भरू शकतात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद चोपडा च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष सौ नम्रता सचिन पाटील यांनी शहरातील सर्व नागरिकांना स्वगणना करण्याचे व प्रगनक घरी आल्यास त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी श्री रामनिवास झंवर यांनीही नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले, सर्व सभापती सदस्य गण तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
