एच एस सी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराचे घवघवीत यश.. चिराग चंद्रकांत विज्ञानबाविस्कर विभागातून तालुक्यात प्रथम
चोपडा,दि.२ (प्रतिनिधी )येथील प्रताप विद्या मंदिराच्या उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेत उत्तम गुण संपादन करत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेच्या कला विभागाचा निकाल ८७.५० टक्के,वाणिज्य विभागाचा आणि विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम शाखेचा निकाल ८८.२३टक्के लागला आहे.
कला विभागातील विद्यार्थिनी बडगुजर स्नेहा संदीप हिने ८० टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे तर सपकाळे पूर्वी नितीन हिने ७३ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि पाटील मुक्ता प्रकाश हिने ६७.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य विभागात ..... पाटील सानिका सुहास हिने ८३.५० टक्के गुण मिळवत प्रथम, जैन प्रियांशू अभयकुमार हिने८२.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर शर्मा वंशिका योगेश हिने ७४.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेत बाविस्कर चिराग चंद्रकांत याने ९१.५० टक्के गुण मिळवत प्रथम, तर पाटील दिव्या गजानन हिने ८९.५० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तसेच पाटील लक्षिता निंबा हिने ८४.६७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. व्यवसाय शिक्षण व्होकेशनल शाखेच्या योगेश काशिनाथ सपकाळे या विद्यार्थ्याने ५५.५० ऑटोमोबाइल विभागात प्रथम तर पिंजारी शोएब अत्तर या विद्यार्थ्याने ५३.५० टक्के गुण मिळवत इलेक्ट्रिकल विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव मा.माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी ,भूपेंद्रभाई गुजराथी, रमेशकाका जैन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका एम डब्ल्यू पाटील,उपमुख्याध्यापक ए एन भट, उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक एस व्ही करमरकर, पी ए नागपुरे, एन एम राजपूत,समन्वयक गोविंदभाई गुजराथी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले.
