सनपुले लोकनियुक्त सरपंचपदाच्या पोटनिवडणूकीत तरुण तडफदार उमेदवार निवृत्ती सुभाष कोळी यांचा विजय
चोपडा,दि.१(प्रतिनिधी) तालुक्यातील सनपुले येथे एस .टी .राखीव लोकनियुक्त सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुकीत निवृत्ती सुभाष कोळी यांनी ८ मते अधिक मिळवित सरपंचपदी विजय मिळवला आहे.
या पुर्वी लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध पुंजु अर्जुन कोळी यांची बिन विरोध निवड झाली होती व त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक लागली होती त्यात लोक नियुक्त सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात होते. केसर बाई वामन भिल,निवृत्ती सुभाष कोळी, प्रतिभा अरुण कोळी,बाळु भिका भिल यांच्यात लढत होऊन तरुण युवा कार्यकर्ते निवृती सुभाष कोळी यांनी 8 मताने आघाडी घेत विजय मिळविला आहे.
संरपंच पदांच्या निवडणुकीत आखाड्यातील उमेदवारांना मिळालेली मते अशी , केसरबाई वामन भिल यांना (47मते) प्रतिभा अरुण कोळी ( 260 मते ),बाळु भिका भिल ( 326 मते) निवृती सुभाष कोळी यांना (334 मते) मिळाली आहेत.सनपुले येथे कमी वयात अवघ्या 24 ते 25 वर्षाचा तरुणाने ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्याने गावात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच निवृती सुभाष कोळी यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी माजी उप सरपंच रतीलाल संतोष कोळी , स्वंराज्य शक्ति सेनेचे प्रमुख समाधान बाविस्कर , दिनकर कोळी, ज्ञानेश्वर कोळी, सुभाष कोळी, शांताराम कोळी, राजेद्र कोळी, पांडुरंग कोळी, रमेश कोळी, दिपक कोळी, दिनेश कोळी, रामदास कोळी, गंगाराम कोळी, नितीन मोरे, उमेश मोरे, वाल्मिक मोरे, भुषण मोरे, रविद्र सोनवणे, विजय बाविस्कर, कैलास पाटील ,सोपान पाटील, विनोद विसावे, लोटन मोरे यांनी मेहनत घेतली .
