सिमला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेल्या अधिकच्या गायी शेतकऱ्यांना दत्तक द्याव्यात शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
चोपडा दि.२०(प्रतिनिधी) : "गो माता शेतकरीच वाचवू शकतो त्यासाठी सिमला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही व्हावी व जप्त केलेल्या अधिकच्या गायी शेतकऱ्यांना दत्तक देऊन शेती व देश समृद्ध करावी अशी मागणी शेतकरी कृती समितीने निवेदन देऊन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली
निवेदनातून त्यांनी म्हटले आहे की,आज देशभर गोरक्षक जीवाची बाजी लावून गो माता वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,त्यांचे प्रयत्नांस मदत करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
शेतकरीच गाय वाचवू शकतो,परंतु तो आर्थिक मेटाकुटीला आल्याने व दिवसाचा गाय पाळणे चा खर्च उचलू शकत नाही.देखील त्याला शक्य होत नाही हे मत सर्विस्तर अभ्यास करून सिमला उच्च न्यायालयाने "भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषद, हिमाचल प्रदेश"यांनी दाखल केलेल्या याचिका क्रं.CWP ६६३१ /२०१४ चे निकाल पत्रात मांडले असून,केंद्र व राज्य सरकार यांना आदेश दिले की
" शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित (MSP) द्या व ते जोपर्यंत होत नाही तो पर्यंत भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांना न्याय द्या. विशेष म्हणजे यात शेतमाल फक्त कडधान्य न धरता नाशवंत म्हणजेच भाजीपाला सह १०५पिकांसाठी लागू करावा असे निर्देश देखील दिले.यात कोणताही शेतकरी याचिका कर्ता नव्हता तरी न्यायालयाने स्वतःहून
गायी पाळणे शेतकऱ्यांना शक्य व्हावे यासाठी हे सांगितलं.
महाराष्ट्र सरकारने हे करावे जेणेकरून कीटकनाशक व भरमसाठ प्रमाणात रासायनिक खतांचा वापर देखील थांबेल व प्रत्येक एका घराआड कॅन्सर,हृदयरोग,मधुमेह किंवा त्यापेक्षाही घातक आजाराचा किमान एकतरी रुग्ण आहे हे चित्र थांबेल.
गोरक्षक खूप मेहनत घेऊन गायी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु एवढ्या मेहनतीने पकडलेल्या गायी गो शाळेत पाठवल्या जात आहेत,त्या साऱ्यांची देखभाल करताना गोशाळा चालकांना खूप त्रास होतो,कारण गो शाळांचा खर्च भागवणे खूप जिकिरीचे आहे.त्यामुळे राज्यातील बऱ्याच गो शाळेतील गायी ह्या फारच वाईट अवस्थेत असतात हे वास्तव नाकारता येत नाही.
यासाठी कृती समितीने त्या गायींना पाळण्यास जे शेतकरी तयार असतील त्यांना दत्तक द्याव्यात.त्यांचा विमा दत्तक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काढावा व जर गाय वारली तर तो पैसा गो शाळांच्या साठी वापरावा.याने गाय माता ही वाचेल व शेतकऱ्यांना खत देखील मिळत राहील.या योजनेत जसे अनुभव येतील तश्या सुधारणा करता येतील,परंतु गो शाळा वरील ताण कमी करणेसाठी व शेती समृद्ध होण्यासाठी कायदा करावा असे निवेदन आज एस बी पाटील , डॉ रवींद्र निकम,अजित पाटील,मोहन पाटील, शाळीग्राम करंकाळ, प्रा प्रदीप पाटील,कुलदीपसिंग पाटील, यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिले.
