धानोरा येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न


धानोरा येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न 


चोपडा,दि.२०(प्रतिनिधी):  तालुक्यातील श्री क्षेत्र धानोरा येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय तृतीयेचे औचित साधून मंदिरात सकाळपासूनच घट पाठ वारी यज्ञ पूजा विधी तसेच भक्तिमय वातावरण पाहण्यात आले. याप्रसंगी श्री राहुल पाठक पुरोहित यांनी दशावतार मुर्ती ना शास्त्रोक्त पद्धतीने जानवे अर्पण करून  शास्त्र संमत पूजा संपन्न केली, यानंतर सतपंथ ज्योत मंदिराचे गादीपती संत श्री विजय प्रकाश महाराज यांच्या हस्ते भगवान परशुरामाचे मंत्र उपचाराने पूजाविधी करण्यात आली त्यानंतर भगवान परशुरामाची महाआरती करण्यात आली, यावेळी "भगवान परशुराम की जय " या घोषणेने मंदिर परिसर दुमदुमून  गेला होता ,या धार्मिक  सोहळ्या साठी गावातील ग्रामस्थ सहित परिसरातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते, भाविकांमध्ये मागच्या वर्षा पेक्षा यावर्षी खूप खूप मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला, कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने