जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून राजकुमार ठाकरे यांना पदोन्नती

 जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून राजकुमार ठाकरे यांना पदोन्नती 


चोपडा दि.२१(प्रतिनिधी):- 'जळगाव वन विभागातील' फत्तेपुर वनपरिमंडळ येथील वनपाल राजकुमार हिरालाल ठाकरे यांची राजपत्रित अधिकारी (रेंजर) वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन भुसावळ, जळगाव वनविभाग  (गस्तीपथक जळगाव) या ठिकाणी पदोन्नती करण्यात आली ..

श्री. राजकुमार ठाकरे  यांचा शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती आहे.आपल्या धडाकेबाज चोख कामगिरी व उत्कृष्ट कार्य पाहून  महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांनी २०/०४/२०२६ च्या शासन आदेशान्वने पदोन्नती केली आहे.

त्यांच्या पदोन्नती बद्दल नगरसेवक निलू आबा तायडे, नगरसेवक किशोर बाविस्कर माजी डि.वाय.एस्. पी प्रताप बाविस्कर , ए.पी. आय सांगवेकर ,प्रा.भाऊसाहेब सोनवणे मित्र मंडळी व नातेवाईक यांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

ते मुळचे चोपडा तालुक्यातील वटार येथील रहिवासी असून सेवानिवृत्त शिक्षक हिरालाल ठाकरे गुरुजींचे चिरंजीव आहेत तसेच त्यांचे बंधू किशोर ठाकरे हे चोपडा तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने