चोपड्यात हिंदू समाजाची भव्य रॅली, पीआयवरील कारवाईबाबत वरिष्ठांकडून पाच दिवसांत निर्णयाचे आश्वासन

 चोपड्यात हिंदू समाजाची भव्य रॅली, पीआयवरील कारवाईबाबत वरिष्ठांकडून पाच दिवसांत निर्णयाचे आश्वासन 



चोपडा,दि.१६(प्रतिनिधी) शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर पाच दिवसात योग्य ती कारवाई करू वरिष्ठांचे आश्वासन चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे त्वरित निलंबन व्हावे या मागणीसाठी काल चोपडा शहरात समस्त गोरक्षक व सकल हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलनी सहभाग घेतला गोरक्षक व हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

श्रीराम मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली मेन रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. चौकात रोहित निकम, गजेंद्र जयस्वाल व संजय शर्मा यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

यावेळी वक्त्यांनी के.जी.एन. कॉलनीत सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर व गोरक्षकांवर होत असलेल्या हल्ल्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच पीआय मधुकर साळवे यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली

यासंदर्भात रोहित निकम व संजय जी शर्मा यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पाच दिवसांत चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

संजय जी शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पीआय साळवे यांच्यावरील कारवाईची मागणी केल्यानंतर सर्व हिंदू संघटनांचे पदाधिकारी व गोरक्षकांनी महाराज चौकात ठिय्या मांडला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पुन्हा दूरध्वनीद्वारे पाच दिवसांत चौकशी करून त्वरित निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर वरिष्ठांचा मान ठेवून आंदोलकांनी रॅलीचे समापन केले. तसेच चोपडा तहसीलदार व पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना निवेदन देऊन मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने