नॅशनल असोशियन ऑफ फिशरमॅन राष्ट्रीय संस्थेच्या ! उत्तर महाराष्ट्र सचिव पदी संजीव शिरसाठ
............. . .............
चोपडा दि.16(प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी जमात बांधवांच्या सहकार्याने नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन या राष्ट्रीय संस्थेची बैठक कार्याध्यक्ष गणेश वैती यांच्या येऊर एअरफोर्स, हिल्स, शुभारंभ लॉन संपन्न होऊन संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र सचिवपदी संजीव पांडुरंग शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसें नियुक्त पत्र राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार शिवडीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार शिवडीकर यांनी मत्स्यव्यवसाय आणि जलशेती केंद्रीय योजना विषयी मार्गदर्शन केले.तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शनपर शासनाचे तंत्रज्ञान, योजना या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी पुढील दिशा निश्चित करण्याचा उद्देशाने नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅनच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील समाजासाठी योजना पोहचवाव्यात त्याचबरोबर विकसित देशांतील प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण मच्छीमारांचा विकास करणे हे ध्येय कार्यकार्त्यांनी ठेवले पाहिजे असे स्पष्ट केले.
कार्यक्रम प्रसंगी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार शिवडीकर, राज्यध्यक्ष साईनाथ तारे, उपाध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे , राज्य सचिव महेंद्र चौगुले , कोकणचे प्रमुख भूपेंद्र गवते ,कार्यकारी अध्यक्ष गणेश वैती,उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सावळे,धुळे जिल्हाध्यक्ष प्रदीप सैंदाणे, जळगाव जिल्हाध्यक्ष गोपीचंद बाविस्कर, सौ.मानिनी वरळीकर, सौ.छाया भानजी ' हेमांगी कोळी तसेच महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते.प्रसंगी संजीव शिरसाठ यांचेसह निवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले .
