शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व निरोप

 शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व निरोप 


चोपडा दि.३०(प्रतिनिधी): शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चोपडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव  माधुरीताई मयूर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सविता जाधव यांनी केले . प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले सर्वप्रथम द्वितीय वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांमधून टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उज्वला भानुदास पाटील व निवेदिता वसंतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला नंतर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 24 -25 मध्ये प्रथम  आलेली विद्यार्थिनी मनीषा पाटील, द्वितीय गायत्री धनगर व तृतीय अंजली मनोरे यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. या सत्कारामुळे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली.

निरोप समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाविषयीच्या भावना व्यक्त करताना, शिक्षणकाळातील विविध अनुभवांना उजाळा दिला. पूजा मैराळे, दिपाली सोनवणे, उज्वला पाटील, गौरव शिंदे व मनोज पाटील यांनी आपल्या आठवणींना शब्दबद्ध केले. महाविद्यालय व शिक्षकांविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली.

वर्षभरात साजरे केलेले विविध सहशालेय व शालेय उपक्रम यांचा फोटोंचा एकत्रित एक व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला या व्हिडिओतील विविध फोटोंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन वर्षातील प्रशिक्षण काळातील विविध स्मृतींना उजाळा मिळाला.अध्यक्षीय भाषणात डॉ. रजनी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत, आगामी परीक्षांसाठी नियोजनबद्ध अभ्यास करण्याचा सल्ला दिला आणि यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली.

कार्यक्रमाला आय.क्यू.ए.सी. समितीचे सदस्य गोविंद गुजराथी, शरद पाटील, प्रा. एम. पी. पाटील, प्रा. एन. डी. वाल्हे, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा. डॉ. सविता जाधव ,कला शिक्षिका मीनल पाटील तसेच कार्यालयीन कर्मचारी आशिष शहा, शुभम गुजराथी, संजय पाटील, वली आदींचे सहकार्य लाभले. आपल्या बहारदार शैलीने संजीवनी तायडे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राहुल धनगर या विद्यार्थ्याने आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. हास्यविनोदाने भरलेल्या खेळकर वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने