चोपड्यात उद्या ४थी वर्ग विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश व इंग्लिश ग्रामर खुली परिक्षा..रिलाएबल क्लासेसचा उपक्रम..सायकल,स्मार्टवाचसह विविध बक्षिसे

 चोपड्यात उद्या ४थी वर्ग विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश व इंग्लिश ग्रामरवर खुली परिक्षा..रिलाएबल क्लासेसचा उपक्रम..सायकल,स्मार्टवाचसह विविध बक्षिसे

चोपडा दि.३०(प्रतिनिधी)येथील हनुमंत पाटील संचलित रिलाएबल इंग्लिश क्लासेस तर्फे दि  ३१/०३/२०२६ मंगळवार रोजी सकाळी८:३० ते १०:३०वाजे दरम्यान रिलाएबल इंग्लिश क्लासेस, परेश डेअरी समोर, पंकज नगर. व रिलाएबल इंग्लिश क्लासेस, पांचाळेश्वर गल्ली, चोपडा  या दोन्ही ठिकाणी इ. ४ थी च्या विदयार्थ्यांसाठी इंग्लिश व इंग्लिश ग्रामर' या विषयांवर आधारित १०० गुणांचा पेपर घेण्यात येत आहे.गुणवंत विदयार्थ्यासाठी विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. 

 या परिक्षेत प्रथम येणा-यास सायकल, ट्रॉफी व प्रमाणपत्र, व्दितीय येणा-यास स्मार्ट वाच, ट्रॉफी व प्रमाणपत्र व तृतीय येणा-यास स्टडी टेबल ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.तसेच ज्यांचा प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक येणार नाही त्यांना सुध्दा सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.हि परिक्षा विनामुल्य असून सर्व ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.परिक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवून बक्षीससे पटकाविण्यासाठी नामी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . ही परीक्षा फक्त सेमी व मराठी मेडीअम साठी आहे.तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने