आरोग्य व स्वच्छता सभापती रमेश शिंदे हे रस्तावर.. गटार व साफ सफाईची प्रत्यक्ष पाहणी
चोपडा दि.१२(प्रतिनिधी) : चोपडा नगरपालिके मार्फत साफसफाई व स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली असून नगरपालिकेचे स्वच्छता,वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती रमेश शिंदे यांनी विविध भागात भेट दिली व स्वच्छतेचे कामाबाबत मार्गदर्शन केले .
नवलपुरा, मन्यारअडी भागात गटार सफाई करण्यात आली आरोग्य सभापती रमेश जी शिंदे व आरोग्यनिरीक्षक श्री व्ही.के पाटील यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी करून कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. तसेच स्वस्तिक टाकी , ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात रस्ते सफाई करण्यात आली याठिकाणी आवर्जून उपस्थिती देत सभापती पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील नगरपालिका नगराध्यक्ष सौ.नम्रता पाटील व यांचे सर्व सभापती, नगरसेवक आणि मुख्याधिकारी रामनिवास झंवर त्यांचे सर्व अधिकार कर्मचारी जोमाने कामास लागले आहेत.एकंदरित शहराचा लवकरच कायापालट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.दरम्यान"नव्याचे नऊ दिवस "असे तर होणार नाही ना अशी शंकाही शहरवासीयांनी उपस्थित केली आहे.

