आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या इशाऱ्या नंतर अंकलेश्वर - बऱ्हाणपूर महामार्गावर दुरुस्ती कामाला वेग
चोपडा,दि.१२(प्रतिनिधी) शहारातुन जाणाऱ्या अंकलेश्वर - बऱ्हाणपूर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असुन या रस्त्यावरील चोपडा ते यावल दरम्यान पुलांचा पृष्ठभाग खराब झालेला होता व तसेच शिरपूर बायपास वरील हॉटेल जयेश समोरील पृष्ठभाग हा अतिशय खराब झाल्याने अपघात होण्याची शक्यता होती.या सर्व बाबींचा विचार करता चोपडा ते यावल रस्त्यावरील पुलांवरील पृष्ठभागाची व या पूर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्याची तसेच चोपडा शिरपुर बायपास व हॉटेल जयेश समोरील रस्त्याची ठेकेदाराकडून तात्काळ दुरुस्ती दि. १४ फेब्रुवारी आधी करण्यासाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी १६ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको चा इशारा दिला होता.सदरील आशयाचे पत्र NHAI प्रकल्प संचालकांना दिले होते त्याची दखल घेऊन तात्काळ शिरपूर बायपास वरील हॉटेल जयेश समोरील रस्त्यावर सिमेंट कॉंक्रीटीकरण प्रगतीपथावर सुरू झाले आहे. कामाची आज आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व काम उत्कृष्ट दर्जाचे आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना दिल्यात.
