चोपडा महाविद्यालयात खेळाडूचा संस्थेतर्फे सत्कार
चोपडा,दि.११(प्रतिनिधी) : दि. ०२ ते ०४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे संपन्न झालेल्या शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील सुशांत युवराज मराठे (12 वी कॉमर्स) या खेळाडू विद्यार्थ्याने 19 वर्षाआतील मुले गटात राज्यस्तरावर उपविजेतेपद प्राप्त करून सिल्वर मेडल मिळविले. सुशांतने राज्यस्तरावर महाविद्यालयाची मेडलची परंपरा कायम राखत अभूतपूर्व यश मिळविले.
या यशस्वी खेळाडूचा संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी बुके व ट्रॅकसुट देऊन सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के. एन. सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक एस. एम. पाटील, क्रीडा संचालिका डॉ. के. एस. क्षीरसागर, क्रीडा शिक्षक अमोल ए. पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
