दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात “पौगंडावस्थेतील शिक्षण' या विषयावरील विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न”

 दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात “पौगंडावस्थेतील शिक्षण' या विषयावरील विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न”


चोपडा,दि.११(प्रतिनिधी) :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव , आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविदयालय, चोपडा मानसशास्त्र विभाग व मानसमित्र समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पौगंडावस्थेतील शिक्षण या विषयावरील विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. 

    या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,  मराठी  अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच प्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते.तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसशास्त्र विभाग प्रमुख, एस.पी.डी.एम.महाविद्यालय, शिरपूर येथील  प्रो. डॉ. एन.एस. डोंगरे, दुसरे प्रमुख मार्गदर्शक साईबाबा मल्टीस्पेशालिटी आणि क्रिटीकल केअर सेंटर चोपडा येथील डॉ. योगिता कदम (काटे), समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, कार्यशाळा समन्वयक मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. आर. पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

              सदर कार्यशाळेचे आयोजन तीन सत्रांमध्ये करण्यात आले होते .पहिल्या उद्घाटन सत्रात  विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकत्र मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक  प्रो. डॉ. एन.एस.डोंगरे  “पौगंडावस्थेत होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक बदल' या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पौगंडावस्था हा लैंगिक संक्रमणाचा काळ असून या काळात शरीरात लैंगिक बदल होतात. पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांमुळे मुलींची स्रीत्वाकडे तर मुलांची पुरुषत्वाकडे वाटचाल सुरु होऊन ती प्रजननक्षम होतात. तसेच या काळात मुला-मुलींमध्ये शारीरिक व मानसिक समस्या दिसून येतात.  विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक बदलांना विषयी  स्व जाणीव विकसित करावी व आपलात वयानुसार होणारे बदल समजून घ्यावे. 

     दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्त्या  डॉ. योगिता कदम (काटे), यांनी पौगंडावस्थेतील शिक्षण का महत्वाचे आहे हे विविध उदाहरणे देवून विद्यार्थ्याना पटवून दिले.

    तसेच उद्घाटन सत्राचे व कार्यशाळेचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी पौगंडावस्थेतील शिक्षण या विषयावर बोलतांना व्यक्तीचे मन कसे कार्य करते ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विविध कवितेचे दाखले देवून उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

          प्रमुख मार्गदर्शक मा. प्रो. डॉ. एन.एस.डोंगरे यांच्या मार्गदर्शना खाली कार्यशाळेच्या दुसरे सत्र हे विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र आले. यात डॉ.डोंगरे यांनी १२ ते २० या  वयोगटातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध  लैगिक समस्यावर आधारित प्रश्न तयार करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही दिली. पौगंडावस्थेतील विविध समज व गैरसमज  या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच  मुलाच्या शंकांचे देखील यावेळी समाधान करण्यात आले

     यानंतर मुलींच्या स्वतंत्र तिसऱ्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. योगिता कदम (काटे) यांनी मुलींना पौगंडावस्थेतील होणाऱ्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच रासायनिक बदल व असमतोल याबद्दल सविस्तर माहिती दिली. मुलींनी आपल्या जीवनशैलीत काय बदल केले पाहिजेत तसेच मैदा, बिस्कीट तसेच तेलातील तळलेल्या इतर स्नैक्स सारख्या वस्तू  पूर्णपणे टाळून आपल्या आहारात बदल करून आपल्या पुढील येणाऱ्या शारीरिक आरोग्याविषयी अडचणी टाळण्यास कशी मदत होईल याविषयी मार्गदर्शन केले. मुलींच्या विविध  शंकांचे देखील यावेळी समाधान करण्यात आले

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर.आर. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन  संदीप बी. देवरे यांनी केले तर व आभार डॉ.मुकेश बी पाटील यांनी  मानले. 

   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.पी.एम.रावतोळे, डॉ. क्रांती क्षीरसागर,  डॉ. एम. एल. भुसारे,  डॉ. डी. डी. कर्दपवार, वाय.एन.पाटील, मयूर ए पाटील,संदीप जी.पाटील , चेतन पी.बाविस्कर,डॉ.मोतीराम पावरा नरेंद्र सोनवणे,मानसमित्र मंडळाचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने