वडगाव सिम पोलिस पाटील यांची चोपडा तालुका पोलिस पाटील अध्यक्षपदी बिनविरोध निवड
चोपडा,दि.९(प्रतिनिधी): चोपडा तालुका पोलीस पाटील संघाच्या कार्यकारणी जाहीर करण्यात आले त्यात वडगाव सीम येथील पोलीस पाटील नंदलाल रावसाहेब बाविस्कर यांची सर्वांमते बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी पुष्पा सुलताने पोलीस पाटील बोराजती यांची निवड करण्यात आली सचिव भागवत दगडू पाटील घाडवेल यांना नियुक्ती देण्यात आली. पोलिस निरीक्षक श्री महेश टाक यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र सोनवणे हातेड पोलिस पाटील यांनी विषय मांडून बैठकिला सुरवात केली व पोलिस पाटील विटनेर यांनी अनुमोदन दिले.ह्यावेळी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन मधील सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.
