चोपडा महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे हँड्स ऑन ट्रेनिंग संपन्न
चोपडा,दि.९(प्रतिनिधी): दि. ०९ फेब्रूवारी २०२६ रोजी दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व प्रोजीनोम लाईफ सायन्स छ.संभाजीनगर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून हँड्स ऑन ट्रेनिंगचे आयोजन पदवी व पदव्यूत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. त्यासाठी ट्रेनर म्हणून छ.संभाजीनगर येथून प्रोजीनोम लाईफ सायन्सचे डायरेक्टर डॉ. विपीन हिरेमठ हे लाभले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ. के.एन.सोनवणे हे उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल उपस्थित होते . प्र.प्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा. डॉ.आर.एम.बागुल यांनी आजच्या काळात विद्यार्थी कौशल्याधिष्ठीत बनणे खूप महत्वाचे आहे असे प्रतीपादन केले.
पहिल्या सत्रात पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळय़ा माल्युकूलर टेक्निक बद्दल माहीती दिली. तसेच दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्वत: हे प्रात्यक्षिक केले. जाहिद मनियार ,स्विटी निकम माधूरी पाटील कल्याणी शिरसाठ आदी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वसीम पटेल यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महेंद्र क्षिरसागर व यतीन पाटील यांचे सहकार्य लाभले.
