सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

 सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात 

जळगावदि.१०(प्रतिनिधी) जिल्ह्यातील तालुक्यातील आमोदे बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयामध्ये सन 1999 ते 2000 या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यास ६५ पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील आमोदे बु.,गाढोदे,जामोद,पळसोद तसेच धरणगाव तालुक्यातील दहिदुल्ला या गावातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठीचा प्रमुख वाटा होता.. पंचक्रोशितील गावांसाठी विद्यालयाचा खूप लाभ होतो..

सन 1985 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यालयाने यंदा आपली 40 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, त्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात  दीपप्रज्वलनाने आणि राष्टगीताने झाली 

या प्रसंगी विद्यालयातील माजी व विद्यमान शिक्षकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. यात शिक्षकांना आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनीसुद्धा मनोगत आणि आपला परिचय करून दिला..

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्र्थी  नाशिक येथील उद्योजक श्री गुलाबराव पाटील यांनी विद्यालयाला उत्तम दर्जाचा प्रिंटर भेट दिला. तसेच भविष्यात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी अध्ययनास उपयुक्त शैक्षणिक साहित्य व उपकरणे भेट देण्याचे आश्वासनही माजी विद्यार्थ्यांनी दिले.

कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव कथन केले. शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच आज विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करता आली, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.हा स्नेहमेळावा आपुलकी, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने