मूकबधिर विद्यार्थ्यांसाठीअन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटप
▪️नगराध्यक्ष लीलाताई चौधरी यांच्या हस्ते उपक्रम
धरणगाव ,दि.१०(प्रतिनिधी) : येथील मूकबधिर विद्यालयात सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. जैन इरिगेशनचे संचालक उद्योगपती अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय, धरणगाव यांच्या वतीने अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात नगराध्यक्षा सौ. लीलाताई सुरेश चौधरी यांच्या हस्ते मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक निलेश चौधरी, नगरसेवक किशोर कंखरे, गुलाब मराठे, परमेश्वर महाजन, भागवत चौधरी, चेतन जाधव, हेमंत महाजन, वाचनालयाचे उपाध्यक्ष चंदनराव पाटील, माजी नगरसेवक नंदकिशोर पाटील, व्यापारी सेनेचे तालुकाप्रमुख निलेश वाणी, पत्रकार विनोद रोकडे, मेडिकल असोसिएशनचे छोटू जाधव, मराठा सेवा संघाचे नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील, उपमुख्याध्यापक संतोष भडांगे, वाचनालयाचे संचालक रामकृष्ण पाटील, प्रतापराव पाटील, सचिव योगेश पाटील पदाधिकारी, शिक्षक-कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ. लीलाताई चौधरी यांच्यासह सर्व मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एच. पाटील सर यांनी केले. या उपक्रमामुळे मूकबधिर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
