नाट्य लेखक,दिग्दर्शक सोमण यांची नगर वाचन मंदिरास भेट

 नाट्य लेखक,दिग्दर्शक सोमण यांची नगर वाचन मंदिरास भेट

चोपडादि.9(प्रतिनिधी) - येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिरास नाट्य लेखक,दिग्दर्शक व सिने कलावंत योगेश सोमण यांनी आपल्या प्रवासात सदिच्छा भेट दिली.श्री.सोमण नुकत्याच पार पडलेल्या व्याख्यानमालेत येणार होते.परंतू त्यांना ऎनवेळी न येता आल्याने त्यांनी आवर्जून भेट देवून संस्थेच्या शतकोत्तर कार्याचा गौरव केला.

त्यांच्या लिखीत  पुस्तकांसह वंदेमातरमच्या सार्धशती निमित्ताने नॅशनल बुक ट्रस्ट दिल्लीने काढलेल्या आनंदमठ या कादंबरीचा मराठी अनुवाद भेट म्हणून दिला.या भेटी निमित्ताने त्यांचा यथोचित सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी केला.यावेळी कार्यवाह गोविंद गुजराथी,संचालक श्रीकांत नेवे,प्रभाकर महाजन,केंद्रप्रमुख संजिव शेटे,ग्रंथपाल गोपाळ दांडेकर आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने