चौगाव येथिल श्री क्षेत्र भोलेनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह

 चौगाव येथिल श्री क्षेत्र भोलेनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह 


चौगाव,ता.चोपडा दि.८(प्रतिनिधी) : चोपडा पासून जवळच असलेल्या चौगाव येथिल श्री क्षेत्र भोलेनाथ देवस्थान येथे सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन दि 9/2/2026 पासून करण्यात येणार असून यात रोज सकाळी काकड आरती , सायंकाळी हरीपाठ व रात्री 8/30ते10/30 कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे यात 9/2/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.रविंद्र‌ महाराज हरणे मुक्ताईनगर,दि 102/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.योगी दत्तानाथ महाराज शिंदखेडा,दि 11/2/2026 रोजी ह‌.भ.प..भानुदास‌ महाराज अमळनेर कर,दि 12/2/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.रविंद्र‌ महाराज वरसाडेकर,दि.13/2/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.कोमल‌ महाराज खेडीभोकरीकर,दि 14/2/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.भावेश‌ महाराज विटनेरकर,दि 15/2/2026 रोजी ह‌.भ‌.प‌.योगेश‌ महाराज वाघाडीकर‌ यांचे कीर्तन होणार असून दि 16/2/2026 रोजी ह‌.भ ‌.प.गजानन‌ महाराज चौगावकर यांच्या काल्याचा कीर्तनाने कीर्तनी सप्ताहाचा समारोप होणार आहे दि 15/2/2026 रोजी नगरप्रदक्षिणा व दिंडी सोहळा होणार असून दि 16/2/2026 रोजी महाप्रसाद दूपारी12 ते5 वाजेपर्यंत होणार असून भाविकांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भोलेनाथ सत्संग मंडळ चौगाव,श्री श्रीराम भजनी मंडळ चौगाव व ग्रामस्थ मंडळ चौगाव यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने