पंकज माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

 पंकज माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

चोपडा,दि.८(प्रतिनिधी): येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नविन शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्ट पूर्ती अंतर्गत आनंददायी शनिवारी दप्तर मुक्त शाळा या उपक्रमात विद्यार्थ्यांचे जीवन कौशल्य वृद्धिंगत करणारा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी *"बाल आनंद मेळावा 2026"* चे आयोजन करण्यात आले. आनंददायी व उत्साहवर्धक अशा कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. दिपालीताई बोरोले यांच्या हस्ते व असंख्य महिला यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  

या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक  खेळात सहभाग घेतला  तसेच विविध मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेला विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. एकूण 79 स्टॉल लावण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि दप्तर मुक्त शाळेत व्यवहार ज्ञान समजून घेतले. या आनंददायी उपक्रमात पालकांनीही सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या चिमुकल्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध पदार्थांच्या स्टॉल ला मान्यवरांनी भेट देऊन आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या पाक कृतीबद्दल गौरवोद्गार काढले आणि या दप्तरमुक्त उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, आत्मविश्वास,  व्यवहाराचे ज्ञान  आणि सहकार्याची भावना निर्माण झाल्याचे बोलून दाखविले.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पौर्णिमा भादले, दिपक सोनवणे, अविनाश पाटील, बाजीराव तायडे, जयेश मंडपे, विनोद जाधव, प्रमोद पाटील, मोनिका देसाई, विजय पाटील वेलसिंग बारेला, गजानन पाटील, आणि सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद  परिश्रम घेतले. तर स्टॉल साठी सर्व विद्यार्थी आणि पालक यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने