बोरोले नगरात महाशिवरात्रीनिमित्त भागवत कथा व अखंड किर्तन सप्ताह
चोपडा दि.८(प्रतिनिधी)- श्री विश्वानाथ महादेव मंदिर बोरोले न. १ या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे भागवत व किर्तन सप्ताह महादेव मंदिर समितीतर्फे ओयोजित करण्यात आला आहे. दि० ९फेब्रुवारी ते १६फेब्रुवारी २६ या कालावधीत होत आहे .सर्व बोरोले न. १ परिसरातील भाविक भक्ताच्या महलीने व कार्यक्रम होत असतो.
भागवत कथेचा सर्व खर्च कै. सुभाष काळू पाटील यांचे स्मरणार्थ महेश सुभाष पाटील यांच्यातर्फे दिला जाणार आहे भागवत कथा ही कथावाचक ह.भ.प मी अशोक महाराज (शिरपुरकर) यांच्या सुमधुर वाणिने संपन्न होत आहे. कथा ही दुपारी १ ते ४: दरम्यान होणार आहे. किर्तनसाठी दररोज वेगवेगळे ह.भ.प. महाराज असुन किर्तनाची वेळ रात्री 8.30 वाजता आहे.
पालखी सोहळा व शोभायात्रा दि० १५/२/२६ रोजी दुपारी २ ते ५ दरम्यान घेणार आहे. कै. मनोजकुमार अग्रवाल यांच्या स्मरणार्थ श्री संजय अग्रवाल याच्याकडून महाप्रसाद (भंडारा) दि. १६ रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत मंदिरा मंदिराच्या प्रागंणात होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री विश्वनाथ महादेव मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे .
