गायकवाड इंग्लिश क्लासमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात
मुक्ताईनगर दि.१२ (प्रतिनिधी) :येथील गायकवाड इंग्लिश क्लासमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, भाषणे, कविता, नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमधील आठवणी सांगत शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना क्लासचे संचालक प्रा. सतीश गायकवाड म्हणाले की, “२०१० पासून सुरू असलेल्या गायकवाड इंग्लिश क्लासमधील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. इंग्लिश विषयातील ग्रामर, रायटिंग स्किल्स, वाचन व पाठ्यपुस्तकांचे अध्यापन अतिशय शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने केले जाते.”
ते पुढे म्हणाले की, नियमित सराव, संकल्पना स्पष्ट करण्यावर दिला जाणारा भर व वैयक्तिक मार्गदर्शनामुळे विद्यार्थी दिवसेंदिवस इंग्लिश विषयात मोठी प्रगती करत आहेत. याचाच सकारात्मक परिणाम म्हणून विद्यार्थी इंग्लिशमध्ये चांगले गुण मिळवून यश संपादन करत आहेत.कार्यक्रमाला प्रा.राजेश गायकवाड सर,श्री आकाश गायकवाड,पूजा मॅडम,ज्ञानेश्वरी ताई यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या निरोप समारंभाने सर्वांच्या मनात अविस्मरणीय आठवणी निर्माण केल्या.

